ASP /SDPO डॅा तेजस सारडा पथकाची कारधा येथे जुगार अड्ड्यावर धाड; ७१,७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक अटक

भंडारा उपविभागीय पोलीस पथकाची मोठी कारवाई; कारधा येथे जुगार अड्ड्यावर धाड, ७१ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त भंडारा, २२ ऑक्टोबर २०२६: भंडारा जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात कडक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मच्छीमार्केट चौक परिसरात जुगार अड्ड्यावर यशस्वी छापा टाकला. […]

Read More

DCP रश्मिता राव यांच्या पथकाची कारवाई नागपुरात कोंबड्यांच्या झुंजीचा पर्दाफाश; परिमंडळ ४ च्या पथकाची धडक कारवाई

नागपूर शहरात कोंबड्यांची बेकायदेशीर झुंज घडवून त्यावर जुगार खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलीस उपायुक्त परिमंडल क्र. ४ च्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. इममवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली असून, घटनास्थळावरून १० जुगारींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. छाप्याची गुप्त माहिती व वेळ:  रश्मीता राव, पोलीस उपायुक्त परिमंडल क्र. ४, नागपूर शहर […]

Read More

वर्धेत महिलांच्या नजरचुकीने सोन्याचे दागिने लांबवणारी ठग महिलांची जोडगोळी जेरबंद!

वर्ध्यात महिला प्रवाशाला मोपेडवर बसवून सोन्याचे दागिने लांबवणारी ठग महिलांची जोडगोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! वर्धा: यवतमाळवरून वर्धेत आलेल्या एका ५३ वर्षीय महिलेला ओळखीच्या बहाण्याने मोपेड गाडीवर बसवून गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोपेड आणि सोन्याचे दागिने असा एकूण […]

Read More

चंद्रपुरात एम.डी. ड्रग्ससह तस्कर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

चंद्रपुरात पोलिसांची धडक कारवाई: ६ लाखांचे नाही, तर २० हजारांचे एम.डी. ड्रग्स जप्त; नागपूर कनेक्शन उघड! चंद्रपूर: युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चंद्रपूर शहरात अत्यंत चलाखीने सापळा रचून मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग पावडरची तस्करी करणाऱ्या एका […]

Read More

१२ लाखांची मिनी बस चोरी प्रकरण: अमरावतीत ३ आरोपींना अटक; १ महिला फरार

अमरावती: गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगर परिसरातून चोरीला गेलेली १२ लाख रुपये किमतीची मिनी बस शोधून काढण्यात डी.बी. पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरी झालेली ३५ सिटर मिनी बस जप्त केली आहे. नक्की काय घडले? फिर्यादी नितीन राजेंद्र खंडार (वय ४०, रा. सारंग नगर, रहाटगाव) यांची ३५ सिटर […]

Read More

चांदूर बाजार हाकाटी: नळाच्या वादातून महाविद्यालयात शिरून तरुणाची हत्या; स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केले

अमरावती ग्रामीण: चांदूर बाजार येथील खळबळजनक हत्याकांड; नळाच्या वादातून महाविद्यालयात घुसून तरुणाची हत्या, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत आरोपीला आवळले पंजे १. घटनेची पार्श्वभूमी व वादाचे मूळ कारण अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरजगाव बंड येथील रहिवासी असलेले वसीम खान सादत खान (वय ३२ वर्ष, मृतक) आणि आरोपी इमरान उर्फ आर्यन […]

Read More

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: मोबाईल चोरीच्या तपासात उघडकीस आले वाहन चोरीचे ७ गुन्हे!

नागपूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई: मोबाईल चोरीचा तपास करताना उघडकीस आले वाहन चोरीचे तब्बल ७ गुन्हे! नागपूर: कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका साध्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावताना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत पोलिसांनी एका मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील […]

Read More

चंद्रपूरमध्ये समतानगर येथे जुगारावर पोलिसांची मोठी धाड; ११ जणांसह १२ लाखांचा मुदमाल जप्त

चंद्रपूर, २० ऑक्टोबर २०२६: रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुकूम भागातील समतानगर येथे सुरू असलेल्या अवैध जुगारावर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका राहत्या घरावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या एकूण ११ जणांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १२,०६,४४०/- रुपये किमतीची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. कारवाईची पार्श्वभूमी: […]

Read More

वर्धा पोलीस मुख्यालयात ‘पोलिस स्मृति दिन’ संपन्न; १५४ हुतात्म्यांना आदरांजली

वर्धा:- आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्धा येथील पोलीस मुख्यालय परिसरात ‘पोलिस स्मृति दिन’ अत्यंत सन्मानपूर्वक आणि  वातावरणात पाळण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पुलगाव येथील कॅम्पाचे ब्रिगेडियर  प्रशांत कुमार सि.ए.डि हे उपस्थित होते. कार्यक्रम आणि मानवंदना: कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वाजता बँड पथकाच्या धून वाजवून करण्यात आली. त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक […]

Read More

लखनऊ खून प्रकरणातील आरोपी नागपुरातून अटकेत

नागपूर शहर गुन्हेशाखा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत लखनऊ येथील चर्चित खून प्रकरणातील फरार आरोपींना नागपुरातून अटक केली आहे. घटनेची पार्श्वभूमी: तक्रार आणि गुन्हा: दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदार रंजन शर्मा यांच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेशातील लखनौ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा (अप. क्र. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!