चंद्रपूर: रामनगर जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश; दोन आंतरजिल्हा आरोपींना अटक, ₹३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने  कारवाई करत रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून दोन आंतरजिल्हा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ₹३,१४,५०० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी:



  • मुस्तफा उर्फ शानू जमील खान (वय ४४ वर्ष, रा. मोमीनपुरा, नागपूर)

  • सलमान अब्दुल रहमान (वय २५ वर्ष, रा. दहीहांडा, जि. अकोला)



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण ₹३,१४,५००):

  • मुस्तफा खान याच्याकडून: मोबाईल, बजाज पल्सर मोटारसायकल, हेल्मेट, कॉलेज बॅग आणि गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे (किंमत ₹८४,०००).



  • सलमान अब्दुल रहमान याच्याकडून: मोबाईल, सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम व इतर मालमत्ता (किंमत ₹२,३०,५००).

उघडकीस आलेले ३ गुन्हे:



१. रामनगर पोलीस स्टेशन : जबरी चोरी

२. रामनगर पोलीस स्टेशन : जबरी चोरी

३. पांचपावली पोलीस स्टेशन, नागपूर शहर : घरफोडी/चोरी – ३४ तोळे सोन्याचे दागिने

कारवाईची पार्श्वभूमी:

रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपी अकोला जिल्ह्यातील दहीहांडा परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे शोध मोहीम राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपी मुस्तफा याने नागपूर शहरातील पांचपावली पोलीस स्टेशन हद्दीत ३४ तोळे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरल्याचीही कबुली दिली. आरोपींचा वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!