अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; तिघांना अटक, ३१,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या एका हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली आहे.

कारवाईचा तपशील:



  • वेळ व दिनांक: २० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री ००:५४ ते पहाटे ०४:३० वाजताच्या दरम्यान.

  • ठिकाण: प्लॉट क्र. ०२, सिद्धार्थ नगर, टेकानाका, श्री मंगल डेअरीसमोर, पाचपावली, नागपूर.



अटक करण्यात आलेले आरोपी:

१. शाहरुख खान वल्द नसुरुल्ला खान (वय ३० वर्षे, रा. टेकानाका)



२. शेख अरमान शेख नसीर (वय २० वर्षे, रा. मक्का मस्जिदजवळ, टेकानाका, पाचपावली)

३. मोहम्मद समिर वल्द मोहम्मद अंसारी (वय २० वर्षे, रा. ताजनगर, बडी मस्जिदजवळ, पाचपावली)



कारवाईची पार्श्वभूमी व जप्ती:

गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचांसमक्ष ही रेड कारवाई करण्यात आली. आरोपी विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना शासनाने बंदी घातलेले तंबाखूजन्य हुक्का पदार्थ पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून हुक्का पॉट, वेगवेगळ्या फ्लेवरचा तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण ३१,०२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नोंदवलेले गुन्हे:

आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे पाचपावली येथे खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • मार्गदर्शन व पथक:
  • ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेन्द्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, आणि सह. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. दर्शन पाटील, सपोनि शिवाजी मनवरे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी पाचपावली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!