
ब्रम्हपुरी पोलिसांची दिवाळी भेट: CEIR पोर्टलद्वारे ४२ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

ब्रम्हपुरी पोलिसांची नागरिकांना दिवाळीची भेट: CEIR पोर्टलच्या मदतीने ४२ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत
सविस्तर बातमी:

ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर): ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करत, पोलिसांनी ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ४२ मोबाईल शोधून काढले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी CEIR पोर्टलचा वापर करून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात व आजूबाजूच्या भागात हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. या शोधमोहिमेत पोलिसांना एकूण ४२ मोबाईल मिळून आले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांचन प. पांडे यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा प्राप्त झाल्याने सर्व मोबाईलच्या मूळ मालकांनी ब्रम्हपुरी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

कारवाईतील सहभागी अधिकारी व कर्मचारी:
-
सदरची कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि पोलीस निरीक्षक कांचन प. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

-
या मोहिमेत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
-
तसेच पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलींद नैताम, पोलीस अंमलदार प्रविन भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनीही या शोधकार्यात मोलाची कामगिरी केली.




