
‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत २ लाख ३२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल.

अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २ लाख ३२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त, दोघांवूरोद्ध गुन्हे दाखल!
अकोला, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६:

अकोला शहरात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. अकोट फैल व टिळक रोड परिसरात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण २,३२,५७८/- रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि वाहने जप्त करण्यात आली असून, दोन जणांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. पहिली कारवाई – मोटरसायकलवरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा आरोपी ताब्यात:
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तीन टॉवरजवळ, अकोट फैल (अकोला) येथे छापा टाकण्यात आला.

-
आरोपी: संजू गिरधारी तायडे (वय ५२ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर, अकोट फैल, अकोला).
-
जप्त मुद्देमाल: आरोपीच्या मोटरसायकलवरील पोत्यांची पाहणी केली असता, विमल पानम मसाला, बाहुबली पानमसाला, नजर, एन-८१, बूक चिप, व्ही-वन सुगंधित तंबाखू, बाराती, बहार, बी.एच.आर. खांडानी तंबाखू, वाह पानमसाला या विविध कंपन्यांचा एकूण ८१,७९३/- रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू मिळून आला.

-
वाहतुकीसाठी वापरलेली होंडा स्पलेंडर मोटरसायकल (क्र. MH-30.R-2399) किंमत ४५,०००/- रुपये, असा एकूण १,२६,७९३/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी आरोपीला अकोट फैल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
२. दुसरी कारवाई – हातकडीतून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा आरोपी ताब्यात:
दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने गणपती मंदिरासमोर, ट्रान्सपोर्ट नगर ते टिळक रोड येथे छापा टाकला.

-
आरोपी: स्वप्नील अशोक आवळे (वय ४० वर्षे, रा. मुकुंदवाडी, अशोकनगर, अकोट फैल, अकोला).
-
जप्त मुद्देमाल: आरोपीच्या हातकडीची (हातगाडी) व प्लास्टिकच्या पोत्यांची तपासणी केली असता, जनता टोबॅको, एक्स पी टोबॅको, नजर पानमसाला, पानपरागत पानमसाला, माझी पानमसाला, ई-१ टोबॅको, औटिना-१ स्वीट सुपारी, झोलट जंबो टोबॅको, राफेल स्वदेशी टोबॅको इत्यादी विविध कंपन्यांचा एकूण ९५,७८५/- रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू सापडला.
-
वाहतुकीसाठी वापरलेली हातगाडी किंमत १०,०००/- रुपये, असा एकूण ९,०५,७८५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहभाग आणि मार्गदर्शन:
अकोला शहर व अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०५ व ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी केलेल्या या संयुक्त कारवायांमुळे अवैध गुटखा व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेहवकर, अधिकारी गोपाल जाधव, माजिद पाठण, अनिल चव्हाण, विष्णू बोडखे आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आर.डी. सोळंके व प्रभाकर काळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांच्या पथकाने पार पाडली आहे.



