कोठारीत दारूची मोठी खेळी जप्त; ३९ पेटी देशी दारूसह १५ लाखांचा ट्रक जप्त, चालक फरार!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


स्थानिक गुन्हे शाखा व कोठारी पोलिसांची धडक कारवाई; ३९ पेटी देशी दारूसह १५ लाखांचा ट्रक जप्त; अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तस्करांवर पोलिस प्रशासनाने शिकंजा आवळण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पोलीस स्टेशन कोठारी यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या धडक कारवाईत बल्लारशाह-कोठारी मार्गावर अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल १६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

नक्की काय घडली घटना?

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन कोठारी हद्दीतील बल्लारशाह-कोठारी मार्गावरील सातबारा हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखा व कोठारी पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून नाकाबंदी केली होती.

या दरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या ट्रक क्रमांक MH34AB5592 च्या चालकाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत ट्रक न थांबवता वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर चालकाने थोड्या अंतरावर ट्रक उभा केला आणि संधी साधून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.



मुद्देमालाचा तपशील:

पोलिसांनी पंचनामा करून ट्रकमध्ये तपासणी केली असता, त्यात अवैध देशी दारूचे मोठे साठे आढळून आले. १. देशी दारू: ‘रॉकेट संत्रा’ कंपनीची देशी दारू असलेल्या एकूण ३९ पेट्या (एकूण ३,९०० नग, प्रत्येकी ९० एमएल), जिसकी किंमत ₹१,५६,०००/- आहे. २. वाहन: वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (क्र. MH34AB5592), किंमत ₹१५,००,०००/-.



एकूण जप्त मुद्देमाल: ₹१६,५६,०००/-



गुन्हा दाखल व पुढील तपास:

घटनास्थळावरून पळून गेलेल्या अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन कोठारी येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम मोटार वाहन कायदा (MV Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई उपविभाग राजुरा पथक आणि पोलीस स्टेशन कोठारी यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली असून, पळून गेलेल्या चालकाचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!