
चंद्रपूर LCB ची मोठी कारवाई: २२.३५ लाखांच्या मुद्देमालासह ३५ गोवंश जप्त, २ जणांना अटक
चंद्रपूर:
स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारा १० चक्का टाटा ट्रक ताब्यात घेतला आहे. या कारवाईत ३५ गोवंशांची सुटका करण्यात आली असून ट्रकसह एकूण २२ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

नाकाबंदी तोडून पळाला ट्रक, पोलिसांनी केला पाठलाग
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. पडोली हद्दीत सापळा रचून नाकाबंदी केली होती. यादरम्यान संशयित १० चक्का टाटा ट्रक (क्रमांक MH 31 CV 0817) तेथून जात असताना पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला.
पोलिस पथकाने कसलाही विलंब न करता तात्काळ ट्रकाचा पाठलाग केला आणि सब स्टेशन पावर ग्रेड, जुना सुमठाणा (भद्रावती) येथे ट्रकला घेराव घालून ताब्यात घेतले.

३५ गोवंशांची सुटका; क्रूरपणे केली जात होती वाहतूक
ट्रकची पाहणी केली असता त्यात ३१ गायी व ४ बैल अशा एकूण ३५ गोवंशांची अत्यंत निर्दयपणे आणि अवैध रीतीने वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त मुद्देमाल (एकूण ₹२२,३५,०००/-):

-
१० चक्का टाटा ट्रक (MH 31 CV 0817): किंमत ₹१५,००,०००/-
-
३५ नग गोवंश (३१ गायी व ४ बैल): किंमत ₹७,००,०००/-

-
०२ मोबाईल हँडसेट: किंमत ₹३५,०००/-
अटक व फरार आरोपींची नावे
-
भुषण ओमकार तरारे (वय २४ वर्षे), रा. आझादनगर, कामठी, जि. नागपूर.
-
सयद जसिन सयद असलम (वय ३३ वर्षे), रा. ताजबाग चौक, नागपूर.
-
राकेशकुमार यावकराम टेकाम
-
मोसिन
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे आरोपींविरुद्ध खालील कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०: कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज)
-
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६: कलम ९(अ), ९, ११
-
भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: कलम ३(१) व ४९
भद्रावती पोलिस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील चंद्रपूर उपविभागीय पथकाने केली आहे.




