शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अंबड पोलिसांकडून १ लाखाच्या मुद्देमालासह २ चोरटे गजाआड.

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंबड (जि. जालना):-

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला (DB Squad) विशेष सूचना देऊन तपासाचे आदेश दिले होते.



गुन्हे प्रकटीकरण पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:



  1. रमेश त्र्यंबक वाघ (वय/रा. वाघलखेडा, ता. अंबड, जि. जालना)

  2. विठ्ठल सर्जेराव मिसाळ (रा. दुधना काळेगाव, ता. जि. जालना)



आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी चोरी केलेल्या ६ पाण्याच्या मोटारी पानेगाव रोडवरील एका शेतात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन:

  • ६ पाण्याच्या मोटारी (पंप)



  • गुन्ह्यात वापरलेली १ मोटारसायकल

असा एकूण १,००,०००/- (एक लाख) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुढील तपास सुरू

या कारवाईमुळे पाण्याच्या मोटार चोरीचा सध्या १ गुन्हा उघडकीस आला असून अंबड पोलीस ठाण्याचे पोह राधाकृष्ण जायभाये हे पुढील तपास करत आहेत. या आरोपींकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

तपास पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पथकात पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोउपनि भगवान नरोडे, पोह यशवंत मुंडे, पोह दीपक पाटील, पोह राधाकृष्ण जायभाये, पोशि अरुण मुंडे, पोशि तुकाराम मदन आणि पोशि सुनील वैद्य यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांकडून समाधान: अंबड पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि कारवाईमुळे स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!