अमरावतीमध्ये ८.१५ लाखांचे एम.डी. ड्रग्स जप्त; गुन्हेगाराला अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती (दिनांक २६ जून २०२६): अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थांच्या साठ्यासह रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ८,१५,००० रुपयांचे ५४.२ ग्रॅम ‘मेफेड्रान’ (एम.डी.) ड्रग्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके (परिमंडळ ०१), रमेश धुमाळ (मुख्यालय), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग)  शिवाजी बचाटे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती माहिती

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना एका खात्रीशीर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, हबीब नगर नंबर १ भागात राहणारा एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आपल्या घरात मेफेड्रान (एम.डी.) नावाचा घातक अंमलीपदार्थ बाळगून त्याची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.



घरावर टाकली धाड

२६ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने हबीब नगर येथील आरोपीच्या घरावर अचानक छापेमारी केली. घराची झडती घेतली असता पोलिसांना ५४.२ ग्रॅम मेफेड्रान ड्रग्स आढळून आले. आरोपीने हा अंमलीपदार्थ विक्रीसाठीच ठेवल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

आरोपीचे नाव आणि जप्त केलेला मुद्देमाल

  • आरोपीचे नाव: अब्दुल इजाज अब्दुल अजीम उर्फ इजाज चन्द्रपूरी (वय ५५ वर्षे, रा. हबीब नगर, नं. ०१, अमरावती).



  • जप्त केलेला मुद्देमाल:

    • ५४.२ ग्रॅम मेफेड्रान ड्रग्स (एम.डी.) – किंमत ८,१३,००० रुपये.



    • एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा – किंमत २,००० रुपये.

    • एकूण जप्त मुद्देमाल: ८,१५,००० रुपये.



सध्या आरोपीविरुद्ध नागपूरीगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

या मोहिमेत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, अतुल वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, दशरथ आडे, महेश इंगोले आणि गुन्हे शाखेचे इतर अंमलदार व कर्मचारी सहभागी होते.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!