“ऑपरेशन प्रहार”: अकोल्यात २.१३ लाखांच्या गांजासह तिघे अटकेत; मागील काही दिवसांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


  • अकोला:-
  • जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. नितीन लेव्हर्कर यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पथक गठित करून ही कारवाई करण्यात आली.

  • छापा व जप्तीची कारवाई:





    • दिनांक: २६ ऑक्टोबर २०२६



    • ठिकाण: पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला हद्दीतील इचे लेआउट, गंगा नगर परिसर.



    • तब्बल जप्त माल: पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ५ किलो ७२० ग्रॅम ओल्सर गांजा, एक मोटार सायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २,१३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    • अटक करण्यात आलेले आरोपी:



      1. शेख सालीम शेख रफिक (वय २१ वर्षे, रा. सायकलपुरा, नांदुरा, जि. बुलढाणा)

      2. मोहम्मद अक्रम शेख सुलेमान (वय ३२ वर्षे, रा. मिल्लत कॉलनी, खामगाव, जि. बुलढाणा)



      3. शेख अल्तमश शेख जब्बार (वय २३ वर्षे, रा. जम जम पार्क, गंगा नगर, अकोला)

    • आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कारवाईसाठी पो.स्टे. जुने शहर अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • मागील काही दिवसांतील एकूण कारवाया:

    • जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व अवैध व्यवहार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

    • यादरम्यान पो.स्टे. अकोट ग्रामीण, अकोट शहर, सिटी कोतवाली व जुने शहर या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यान्वये एकूण ४ कारवाया करण्यात आल्या.

    • या कारवायांमध्ये एकूण ९ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे १५,१३,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  • पोलिसांचे आवाहन:  अकोला पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या परिसरात जर कोठेही अंमली पदार्थांची विक्री किंवा अवैध व्यवहार होत असल्याची माहिती मिळाल्यास, ती तत्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी.

  • मार्गदर्शन व पथक:  कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन लेव्हर्कर (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि जुने शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!