पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त,

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धारणी पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ६ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

धारणी: अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्राम बैरागड येथील फॉरेस्ट नाका रोडवर सापळा रचून एक मोठी कारवाई केली आहे.



काय आहे घटना? दिनांक १७ जुलै २०२६ रोजी धारणी पोलिसांच्या पथकाने बैरागड येथील फॉरेस्ट नाका रोडवर सापळा लावून एका ट्रॅक्टरची पंचांसमक्ष तपासणी केली. या तपासणीत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध रित्या भरलेली रेती आढळून आली. पोलिसांनी वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता, चालकाकडे कोणताही परवाना किंवा कागदपत्रे मिळून आली नाहीत.

जप्त केलेला मुद्देमाल: पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:



  • १ ब्रास रेती: किंमत अंदाजे ८,००० रुपये

  • महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (रजिस्टर नं. MP 41 AC 5810): किंमत अंदाजे ५,००,००० रुपये



  • लाल रंगाची विना नंबर ट्रॉली: किंमत अंदाजे १,५०,००० रुपये

  • एकूण जप्त मुद्देमाल: ६,५८,००० (सहा लाख अठ्ठावन हजार) रुपये



आरोपींची माहिती आणि गुन्हा दाखल: या कारवाई दरम्यान ट्रॅक्टर चालक शेख जुबेर शेख इकराम (वय २२ वर्षे, रा. बैरागड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने चौकशीत सांगितले की, ट्रॅक्टर मालक शेख जावेद शेख लतीप पटेल (वय ४० वर्षे, रा. बैरागड, ता. धारणी) याच्या सांगण्यावरून तो ही रेती वाहतूक करत होता. ट्रॅक्टर मालक आणि चालकाने संगणमत करून शासकीय महसूल बुडवून विनापरवाना अवैध रित्या गौण खनिज (रेती) चोरी करून वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९, १५, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ७, तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १३०(१)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गिरडकर करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक: सदरची धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सपोनि संदीप पाटील, पोहेकॉ प्रकाश गिरडकर, पोहेकॉ सतिश राठोड , पोकॉ जगत तेलगोटे , पोकॉ गजानन जामीनकर , पोकॉ आदित्य सुरनर  आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन लोकपुरे  व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!