
यवतमाळ: बाभूळगाव येथील ‘धनश्री ज्वेलर्स’ दरोडा प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील ३ जण अटकेत; २२४ ग्रॅम सोने जप्त
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनश्री ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी ३ मुख्य आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २२४ ग्राम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
घटनेचा तपशील व पार्श्वभूमी
-
घटना: दिनांक २७ जुलै २०२६ च्या मध्यरात्री बाभूळगाव शहरातील ‘धनश्री ज्वेलर्स’ या दुकानाची रेकी करून चोरट्यांनी दुकान फोडले.

-
चोरीस गेलेला ऐवज: दुकानातून मनी सेव्हन पीस, बदामी अंगठी, लहान-मोठे डोरले, कानातील डुल इत्यादी असा एकूण १७,७०,००० रुपयांचा (३५४ ग्रॅम) सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
-
फिर्यादी: दुकान मालक जिंतेंद्र प्रेमचंद तातेड (रा. अग्रवाल लेआउट, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा तपास व सी.सी.टी.व्ही. फुटेज
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारीअमोल कोळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश चवरे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली व विविध पथके तयार केली.
-
अंगुलीमुद्रा तज्ज्ञ (Fingerprint) व श्वान पथक: न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा पथक आणि ठसे तज्ज्ञांनी दुकानाची पाहणी करून सुस्पष्ट ठसे हस्तगत केले.

-
२३ CCTV कॅमेऱ्यांची पाहणी: पोलिसांनी परिसरातील २३ सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. चोरटे दुकानात प्रवेश करताना अस्पष्ट दिसत असल्याने तपासाची चक्रे आरोपींच्या पळण्याच्या दिशेने फिरवण्यात आली.
-
सराईत गुन्हेगार निष्पन्न: ठसे तज्ज्ञांच्या तपासात निष्पन्न झाले की, हा गुन्हा एका सराईत गुन्हेगाराने केला असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी
स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सापळा रचून ५ ऑगस्ट २०२६ रोजी ३ आरोपींना ताब्यात घेऊन बाभूळगाव पोलिसांच्या स्वाधीन केले:
-
अजय मोहन काळे उर्फ पारधी (वय २६ वर्षे, रा. ग्राम रुसीया, ता. कुरवई, जि. विदिशा, मध्य प्रदेश)
-
विनोद वानसोब पवार (वय ४६ वर्षे, रा. मोगरा पारधी बेडा, ता. जि. अमरावती)
-
मंगलसिंग उर्फ बबलू सुरेश पारधी (वय १९ वर्षे, रा. मुरादपूर, ता. बामोरी, जि. गुना, मध्य प्रदेश; सध्या रा. सिराजपूर फाटा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर)
मुद्देमाल हस्तगत व पुढील कारवाई
आरोपींची ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२६ दरम्यान सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून:
-
२२४ ग्राम सोन्याचे दागिने
-
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध विशेष पथकामार्फत सुरू आहे.
पोलीस अधिकारी व पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहा. पोलीस अधीक्षक अमोल कोळी आणि पो.नि. सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगाव ठाणेदार दिपमाला भेंडे, सायबर ठाणेदार यशोधरा मुनेश्वर, तसेच एलसीबी व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




