
ऑनलाइन वाहनांच्या नावाने ५.५ लाखांची फसवणूक; नागपूरच्या आरोपीला अकोला पोलिसांकडून अटक
अकोला येथील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला खदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेचा तपशील व फसवणुकीचा प्रकार:-

-
गुन्हा नोंद: खदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १३१७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६ (२), ३१८(४), आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
घटना: तक्रारदार हे चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपींनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वाहन विक्रीचे भासवून तक्रारदाराची एकूण ₹५,५०,००० (पाच लाख पन्नास हजार रुपये) ची ऑनलाईन व्यवहाराद्वारे फसवणूक केली.

-
आरोपीला अटक: तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी मोहम्मद सुलेमान जामीन मुघल (वय ३० वर्षे, रा. नागपूर) याला नागपूर येथून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
-
मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता: या गुन्ह्यात इतरही आरोपींचा शोध सुरू असून यातून आंतरराज्यीय ऑनलाईन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

-
रक्कम गोठवली (Freeze): सायबर पोलीस ठाणे अकोला यांच्या मदतीने तक्रारदाराचे फसवणूक झालेले ₹१,००,००० (एक लाख रुपये) ऑनलाईन ट्रॅक करून फ्रिज करण्यात पोलिसांना यश आले आहे.
- नागरिकांना पोलिसांचे आवाहन :-
नागरिकांनी ऑनलाईन खरेदी-विक्री करताना केवळ अधिकृत आणि व्हेरिफाइड (Verified) वेबसाईटचाच वापर करावा. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन वेबसाईटवरील जाहिराती आणि फोन कॉलद्वारे दाखवल्या जाणाऱ्या आर्थिक फायद्याच्या अमिशांना बळी पडू नये व ऑनलाईन व्यवहारात सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तपास पथक :-
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, पोहवा राजेश वानखडे, पोशी नितीन अकोटकर आणि पोशी संदीप काटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.




