अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ८ घरफोडीचे गुन्हे,मुद्देमाल हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

रात्री घरफोडी  करणारा अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन, ०८ घरफोडीचे गुन्हे केले उघड,सोने चांदीचे दागिण्यासह एकुण १४,९३,०००/- रू. कि मु‌द्देमाल हस्तगत केला हस्तगत…..

सोलापुर(प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी जिल्हयामध्ये घरफोडी करणारे आरोपीचा शोध घेवुन घरफोडीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकरीता  आदेशीत केले होते.







त्यानुसार  पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक, सुरज निंबाळकर व त्यांचे पथक टेंभुर्णी पोलिस ठाणे हद्दीत मालाविषयी गुन्हयाचे तपासाकामी गस्त घालत असताना पोहवा विजय कुमार भरले यांना गोपनिय बातमी  मिळाली की, रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे याने सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथील घरफोडीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे व तसा गुरंन १९५/२०२५ बीएनएस २०२३ चे ३३१(४), ३०५ (अ) हा गुन्हा नोंद आहे. तो सध्या टेंभुर्णी येथील टेंभुर्णी ते अकलुज कडे जाणा-या अकलुज चौकात फिरत आहे. सदरच्या गोपनीय महीतीच्या अनुषंगाने पो उप-नि सुरज निंबाळकर व त्यांचे पथक सदर ठिकाणी पोहोचुन बातमीतील वर्णना प्रमाणे असलेल्या इसमास सापळा रचुन पथकाने ताब्यात घेतले.



सदर इसमास त्याचे नावं गाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नावं मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे वय ४२ वर्षे, रा. भाटनिमगाव ता. इंदापुर जि. पुणे. असे असल्याचे सांगितले. त्यावरून नमुद आरोपीकडे पो उप-नि सुरज निंबाळकर व त्यांचे पथकाने अधिक तपास केला असता, सदर आरोपी मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे व त्याचे साथीदार १) राम काळुराम भोसले २) श्याम काळुराम भोसले दोघे रा. पिटकेश्वर ता. इंदापुर जि. पुणे याने मिळून सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथे नोंद असलेला गुरंन १९५/२०२५ बीएनएस-२०२३ चे ३३१ (४), ३०५ (अ) हा गुन्हा केल्याची कबुली दिली नमुद आरोपीकडे सखोल तपास करता त्यांनी मोहोळ, टेंभुर्णी, कुर्डवाडी, माळशिरस, अकलुज, पंढरपुर याठिकाणी मागील काही महिन्यामध्ये त्याचे साथीदारा सोबत सोलापूर तालुका,माळशिरस अकलुज,कुडुवाडी,टेंभुर्णी,पंढरपुर तालुका पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी करून चो-या केल्याची कबुली दिली.



नमुद दोन्ही आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता सदर गुन्हयात चोरीस गेले मुद्देमाला पैकी एकुण ४,०६,३००/- रू. सोन्या चांदीचे दागिणे व १,८३,०००/- रू. किमतीचे मोबाईल हॅन्डसेट असे एकुण किंमत ५,८९,३००/-रू.असा एकुण १४,९३,०००/- रू किमतीचा मुद्देमाल आरोपी याचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक / सुरज निंबाळकर, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत.

नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे गुन्हे अभिलेख पाहता सोलापूर, यापुर्वी आरोपी याचेवर सांगोला, परंडा, बारामती, इंदापुर, याठिकाणी घरफोरी (७) व मारामारीचे (३) सारखे असे एकुण १० गुन्हे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी  पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक, प्रितम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उप-निरीक्षक सुरज निंबाळकर, पोहवा सलीम बागवान, हरीदास पांढरे, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, मपोहवा अश्विनी गोटे, पल्लवी इंगळे, दिपाली जाधव, पोशि अन्वर आत्तार, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, मपोशि सुनंदा झळके, चापोशि दिलीप थोरात व सायबर पोलिस ठाणे येथील व्यंकटेश मोरे यांनी बजावली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!