
अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पाठलाग करुन केला किरकोळ विक्रीसाठीचा मुद्देमाल जप्त,आरोपी….
अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करुन साठवणूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,चारचाकी वाहन व विदेशी दारुसह एकुण ५,५५,४००/- रु. चा मुद्देमाल जप्त,आरोपी फरार…..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १४ ॲागस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, मालगुजारीपुरा, वर्धा येथे राहणारा – अमीत अग्रवाल हा त्याच्या सिल्व्हर रंगाचे मारोती स्विफट चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. ३१ सिआर ०६८८ मध्ये नागपुर कडुन अवैद्यरीत्या विदेशी दारुचा साठा भरुन त्याची वाहतुक करतोय तसेच सदरचा साठा हा अनमोलनगर, वर्धा येथे विक्री करीता घेवुन येतो आहे.



अशा गोपनीय माहीती माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानिक गुन्हे शाखेचे पथका मार्फत अनमोलनगर, वर्धा येथे नाकेबंदी करीत असतांना थोड्या वेळात माहीती प्रमाणे सिल्व्हर रंगाची मारोती स्विफट चारचाकी गाडी कमांक एम.एच. ३१ सिआर ०६८८ येतांना दिसली त्यास थांबण्याचा ईशारा केला असता त्याने त्याचे ताब्यातील वाहन थांबविले नाही. सदर वाहनाचा पाठलाग केला असता सदरचे वाहन हे समतानगर, वर्धा परीसरात मिळुन आले. तसेच यातील आरोपी पोलिसांना पाहुन घटनास्थळा वरुन पसार झाला.

सदर वाहनास ताब्यात घेवुन त्याची पाहणी केली असता सदरहु वाहन मध्ये वेगवेगळया कंपनीच्या विदेशी दारुने भरलेल्या सिलबंद शिशा किंमत ५५,४००/- रु व सिल्व्हर रंगाचे मारोती स्विफ्ट चारचाकी गाडी क्रमांक एम. एच. ३१ सिआर ०६८८ किंमत ५,००,०००/- रु असा एकुण किंमत ५,५५,४००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला तसेच यातील पसार आरोपी याने स्वतंत्र दिनाचे पुर्व संधेला मोठया प्रमाणात चारचाकी वाहनाचे साहाय्याने अवैद्यरीत्या विदेशी दारुची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन वर्धा (शहर) येथे कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि बालाजी लालपालवाले, पोउपनि राहुल ईटेकर, पोहवा हमीद शेख, अमर लाखे, चंद्रकांत बुरंगे, अमरदीप पाटील, भुषण निघोट, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



