ऑनलाइन जुगार अड्ड्यावर राजापेठ पोलिसांची धाड; दोघांवर गुन्हा

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राजापेठ पोलिसांची ऑनलाइन गेमिंग-जुगार अड्ड्यावर कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, साहित्य जप्त

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 17 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता यादव मार्केट, सुतगिरणी रोड, अमरावती येथील एका दुकानावर राजापेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान तेथे रुपेश देविदास कोठार (वय 30, रा. महाजनपुरा, अमरावती) हा ‘फन टार्गेट’ नावाचा ऑनलाइन जुगार खेळ चालवत असल्याचे आढळून आले. तसेच निखिल प्रभाकरराव अमळ (वय 34, रा. पिंपळखुटा, अमरावती) हा त्या जुगारात पैसे लावताना पोलिसांच्या ताब्यात आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 15,700 रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 509/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!