अमरावती: वृद्ध सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैसे लुटणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: फुलबासा, मंगलधाम कॉलनी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेणाऱ्या आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. श्रवण राजेश बनारसे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त  यशवंत सोळंके ,पोलीस उपआयुक्त  प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त  नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

घटनेचा सविस्तर तपशील: फिर्यादी देवनारायण शिवचरण पांडे (वय ७२ वर्षे, रा. उषा कॉलनी, लॉर्डस हॉटेल जवळ, अमरावती) हे बांधकामाच्या ठिकाणी चौकीदारीचे काम करतात. १ जुलै २०२६ रोजी रात्री २:०० वाजेच्या सुमारास ते फुलबासा, मंगलधाम कॉलनी येथे चौकीदारी करत असताना झोपले होते. त्या दरम्यान आरोपी श्रवण बनारसे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी अचानक तिथे येऊन पांडे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील १,०५० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपी तेथून फरार झाले.



या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५१४/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६), ३२४ (४), ३५१ (२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस कारवाई आणि अटक: गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी श्रवण बनारसे अमरावती शहरात आपली ओळख लपवून राहत होता. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरुण नगर, महादेव खोरी येथील त्याच्या राहत्या घरातून सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासकामी त्याला फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



या पोलीस पथकाने केली कारवाई: गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोउपनि फिरोज खान, पोहवा मंगेश लोखंडे, पोहवा संभाजी केन्द्रे, पो.हवा. नाझिमोद्दीन सैयद, पो.ना. सचिन भोयर, तसेच पोलीस अंमलदार रंजित गावंडे, सागर ठाकरे, नरेश मोहरिल, निखील गेडाम, सूरज चव्हाण आणि चालक चेतन शर्मा व प्रभात पोकळे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!