
अमरावती हत्येचा अवघ्या काही तासांत उलगडा; ३ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमरावती शहर: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या; काही तासांतच ३ आरोपींना अटक
अमरावती (दि. ०३ ऑगस्ट २०२६): अमरावती शहरातील बापट चौक परिसरात २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २३:२५ ते २३:३० वाजेच्या सुमारास एका तरुणावर तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून धारदार शस्त्राने आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
-
मृतकाचे नाव: शरीफ बेग रशीद बेग (वय ३१ वर्षे, रा. वॉटर सप्लाय जवळ, लालखडी, अमरावती).

फिर्यादी: अहमद बेग रशीद बेग (वय २५ वर्षे, रा. वॉटर सप्लाय जवळ, लालखडी, अमरावती) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे अपराध क्र. ३४१/२०२६, कलम १०३ (१), ३(५) बी.एन.एस. (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडल्यापासून गुन्हे शाखा अमरावती शहर आणि पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांचे संयुक्त पथक समांतर तपास करत होते.

-
शेख रेहान शेख हारून (वय २७ वर्षे, रा. सुफियान नगर, अमरावती)
शेख नुरेण शेख इरफान (वय २१ वर्षे, रा. सबा नगर गल्ली नं. ३, अमरावती)

इरफान खान उर्फ गोलू जावेद खान (वय २७ वर्षे, रा. अकबर नगर, अमरावती)
सदर कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला सर, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके (परिमंडळ-०१), पोलीस उपआयुक्त शाम घुगे (परिमंडळ-०२), पोलीस उपआयुक्त प्रांजली सोनवणे (मुख्यालय) आणि . सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे (राजापेठ विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





