पिंपळखुटा येथील घरफोडीचा २४ तासांत छडा: मोर्शी पोलिसांची कारवाई, दोन आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा मोर्शी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत यशस्वी छडा लावला असून, दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

 पिंपळखुटा येथील रहिवासी ६० वर्षीय सीताराम पुनाजी भानगे यांनी नवीन घर बांधण्यासाठी त्यांच्या ८ बकऱ्या विकल्या होत्या. त्यातून आलेले ९०,००० रुपये रोख, १०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि महत्त्वाचे कागदपत्रे त्यांनी घरातील लोखंडी संदुकामध्ये (पेटीत) ठेवले होते.



दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बकऱ्या चरायला गेले. सायंकाळी ५:०० वाजता परत आल्यावर घराची कुडाची भिंत फोडून अज्ञात चोराने लोखंडी संदूक पळवल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस कारवाई व आरोपींना अटक गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड आणि पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दिशा निश्चित केल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले:



  • कुणाल प्रवीण शहाणे (वय १९ वर्षे, रा. पिंपळखुटा मोठा, ता. मोर्शी)

  • प्रशिक बाळासाहेब इंगळे (वय १९ वर्षे, रा. हाशमपूर, ता. मोर्शी)



कडक चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

जप्त केलेला मुद्देमाल



  • रोख रक्कम: ₹२०,५००/-

  • सोन्याची पोत (दोन डोरले व मणी): किंमत ₹१०,०००/-

  • गुन्ह्यात वापरलेली हुंदाई कार (क्र. MH 02 DW 2201): किंमत ₹५,००,०३०/-

  • एकूण जप्त मुद्देमाल: ₹५,३०,५००/-

तपास पथक :-

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक राहुल आठवले, पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर आणि अथर्व कोहळे यांच्या पथकाने केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!