घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नागपूर गुन्हे शाखेकडून १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर शहर व वर्धा जिल्ह्यात घरफोडी अन् वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई, १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर:



नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने धडक कारवाई करत नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ५ गुन्हे (४ घरफोडी व १ वाहनचोरी) उघडकीस आणण्यात यश आले असून ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून सुमारे १५ लाख ६३ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उघडकीस आलेले गुन्हे

युनिट-३ च्या पथकाने केलेल्या कसून तपासात खालील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत:



  • लकडगंज पोलीस ठाणे (नागपूर)

  • रामनगर पोलीस ठाणे (वर्धा)



  • वर्धा शहर पोलीस ठाणे:

  • सेलु पोलीस ठाणे (वर्धा)



  • ताब्यात घेतलेले आरोपी

१. भूषण उर्फ मोसा अशोक ठाकरे (वय २३, रा. नवाबपुरा मशिदीजवळ, ताज साई हॉटेलमागे, पोलीस ठाणे कोतवाली, नागपूर)

२. गौरव सुरेश खडसे (वय २०, रा. नवाबपुरा, राम डेरीच्या मागे, पोलीस ठाणे कोतवाली, नागपूर शहर)

३. क्रिश रामचरित्र जयस्वाल (वय १९, रा. संताजी नगर, वानखेडे आटा चक्कीजवळ, पोलीस ठाणे कन्हान)

४. अमन बिसन देव सहानी (वय २३, रा. इंदर कॉलनी, टेकाडी, पोलीस ठाणे कन्हान)

५. विधीसंघर्षग्रस्त बालक (वय १७, रा. HB टाऊन, कळमना, नागपूर शहर)

६. विधीसंघर्षग्रस्त बालक (वय १७, रा. राजीव गांधी नगर, यशोधरा नगर, नागपूर)

जप्त केलेला मुद्देमाल

क्र. मुद्देमालाचे विवरण अंदाजे किंमत (रु.)
५ किलो चांदीचे दागिने व भांडी ११,८०,०००/-
चोरीचे मोबाईल व हेडफोन ६,०००/-
रोख रक्कम २,८९०/-
चोरीची व गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा (MH 49 CP 1067) ८०,०००/-
रॉयल एनफिल्ड दुचाकी (MH 49 CK 6614) २,००,०००/-
आरोपींचे ५ मोबाईल फोन १,७५,०००/-
एकूण एकूण जप्त मुद्देमाल १५,६३,८९०/-

पुढील कारवाई

नागपूर व वर्धा हद्दीतील विविध घटनास्थळांवरून चोरी झालेला सर्व मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर गुन्ह्याच्या पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना जप्त मुद्देमालासह वर्धा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) राम ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट  चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर व त्यांच्या पथकाने नागपूर गुन्हे शाखा सायबर पथकाच्या विशेष सहकार्याने यशस्वीरीत्या पूर्ण केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!