वर्धा जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे आढावा बैठक पार पडली; सण-उत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


वर्धा (विशेष प्रतिनिधी):

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माहे सप्टेंबर-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. सदर बैठक पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.



या बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आगामी सण-उत्सवांमधील सुरक्षा, सायबर सुरक्षा, गुन्हे नियंत्रण आणि पोलीस प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.



बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व सादरीकरण

१. नवरात्रोत्सव आणि सण-उत्सवांची सज्जता

  • वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक चतरकर यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन (PPT) द्वारे नवरात्रोत्सवाच्या नियोजनाचा आराखडा मांडला.



  • संपूर्ण जिल्ह्यात एकूण १,२५६ देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून सर्वत्र विशेष सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि मंडळ-संपादकांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यास सांगितले आहे.



  • समन्वयासाठी प्रत्येक मंडळात एक जबाबदार अधिकारी नियुक्त करण्यात आला असून विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

  • उत्सवादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.



२. ‘सायबर जनजागृती महिना’ उपक्रम (ऑक्टोबर २०२६)

  • सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या ‘सायबर जनजागृती महिना’ उपक्रमाचा ७-टप्प्यांतील कार्य आराखडा सादर केला.

३. आंदोलने व सोशल मीडिया नियंत्रण

  • आगामी काळातील राजकीय व सामाजिक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले.

  • आंदोलने हाताळताना संयम आणि योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अफवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर कडक नजर ठेवली जाणार आहे.

४. अवैध धंदे व गुन्हेगारीवर कठोर कारवाई

  • स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग, जबर चोरी, वाहन चोरी तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

  • दारूबंदी आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत विशेष मोहिमा राबवून गुन्हेगारांवर सतत वचक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांचे मुख्य निर्देश

  • कायदा व सुव्यवस्था कार्यशाळा: सर्व उपविभागीय पोलीस अधिकारीआणि शहर पोलीस निरीक्षक यांनी एकत्रित येऊन कायदेशीर मुद्यांवर कार्यशाळा आयोजित कराव्यात.

  • वेळेत दोषारोपपत्र (Charge Sheet): सर्व गुन्ह्यांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) मुदतीत न्यायालयात सादर केले जावे.

  • अपघात तपास (Fatal Accidents): अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघाती गुन्ह्यांचा तपास अत्यंत गांभीर्याने आणि शास्त्रीय पद्धतीने केला जावा.

  • सेशन कमिटेड केसेस: पोलीस यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा दिरंगाईमुळे कोणतीही ‘सेशन कमिटेड केस’ सुटू नये, याची कठोर दक्षता घ्यावी.

  • ताणतणावमुक्त वातावरण व कल्याणकारी उपाय: पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न व ताणतणावमुक्त ठेवावे. अधिकाऱ्यांनी पोलीस कुटुंबांशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात.

उपस्थिती:

या बैठकीस वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि इतर संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीचा समारोप वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित स्नेहभोजनाने झाला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!