पुलगाव पोलिसांनी पकडला शहरात येणारा अवैध देशी विदेशी दारुसाठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलीस अधिक्षक, नूरुल हसन,यांनी  सर्व ठाणेदार वर्धा जिल्हा यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते,त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात येत आहे….

पुलगाव(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,वरिष्ठांचे आदेश निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी/सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण ,पुलगाव तसेच ठाणेदार पोलिस निरीक्षक दारासिंग राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली पुलगाव परिसरातील अवैधरित्या नजीकच्या जिल्ह्यातून येणारा देशा-विदेशी दारुसाठा संबंधाने दिनांक 19/12/2023 रोजी पहाटे 04/30 वा दरम्याण मलकापुर बस स्टॅन्ड येथे नाकेबंदी केली असता आरोपी 1)
शुभम केशव खडसे वय 26 वर्ष रा. भिम नगर सावंगी (मेघे) हा त्याचे चारचाकी वाहनातुन विदेशी दारुची वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन





1) जुनी वापरती मारोती अल्टो कंपनीची फोर व्हीलर सिल्वर रंगाची गाडी क्रमांक एम. एच./29 /एन/ 9721 की 4,00,000/ रुपये



2) 11 खर्डाचे खोक्यात देशी दारुने भरलेल्या 90 ML च्या टँगो कंपनीच्या शिलबंद 1100 शिश्या प्रती नग 50/- रुपये प्रमाणे 55,000/- रुपये



3) 05 खर्डाचे खोक्यात ओसि कंपनीच्या विदेशी  दारुने भरलेल्या 180 ML च्या 240 शिलबंद शिशा प्रती शिशि 200/ रु प्रमाने एकुन 48000/ रु

4) 03 खर्डाचे खोक्यात ओसि ब्ल्यु कंपनीच्या विदेशि दारुने भरलेल्या 180 ML च्या 72 शिलबंद शिशा प्रती शिशि 250/रु प्रमाने एकुन 18000/ रु5) 01 खर्डाचे खोक्यात रायल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारुने भरलेल्या 180 ML च्या 18 शिलबंद शिशा प्रती शिशी 300/ रु प्रमाने एकुन 5400/- असा
एकुन जु.की 5,26,400/ रु चा माल मिळुन आला आरोपी क्रमांक 2) कोहीनुर खडसे रा. सालोड हिरापुर गाडी सोडुन फरार झाला वरुन वरील दोन्ही आरोपी व आरोपी क्रमांक 3) विटाळा येथील उदय बार चा मालक यांचे विरुद्ध गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी/सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हान,पोलिस निरीक्षक दारासिंग राजपुत पोउपनि सदानंद वडतकर यांचे योग्य मार्गदशनात गुन्हे अन्वेशन पथक पुलगाव चे पोहवा चंद्रशेखर चुटे, नापोशि रविंद्र जुगनाके, अमोल जिंदे, उमेश बेले, महादेव सानप, आशिष लाडे, महेंद्र पाटील, रत्नाकर पांडे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!