
बकरी चोरीच्या गुन्ह्याचा एका दिवसात उलगडा करण्यात सिंदी रेल्वे पोलिसांना यश…
बकरी चोरीच्या गुन्हयातील 6 आरोपींना निष्पन्न करुन त्यांचेवर दरोड्याची कलमवाढ करुन त्यांना सिंदी (रेल्वे) पोलिसांनी केले जेरबंद….
सिंदी(रेल्वे)वर्धा-प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(29) रोजी फिर्यादी नामे युगल सत्यनारायण अवचट रा. वार्ड क्र 6 सिदी रेल्वे यांनी तक्रार दिली की, त्यांची परसोडी शिवारात शेती असुन शेता बकरी पालन व्यवसाय आहे त्यामधुन 51 नग लहान मोठ्या बकऱ्या व बोकुड चोरीस गेलेले असुन त्यांचा संशय त्याचे शेतातील नोकर नामे रामेश्वर दौलतराव बोरीकर व विठ्ठल गोविंदराव परचाके यांचे वर असल्या बाबत तकार प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे येथे अपराध क्रमांक 78 / 2024 कलम 381,34 भादवी चा नोंद करूण तपास सुरु होता.
त्याअनुषंगाने दिनांक 01.03.2024 रोजी नमुद गुन्हयाचे तपासा दरम्याण नमुद गुन्हयातील संशयीत ईसमाचा शोध घेवुन त्यांचे कडे गुन्हया बाबत कसुन चौकशी केली असता संशयीतानी तपासामध्ये आरोपी नामे 1) अरूण बबनराव मोहीते रा. परसोडी ता. सेलु ह.मु. गौराळा ता.हिगणा जि. नागपुर यांचा सहभाग असल्याची खात्रीशीर माहीती दिल्याने त्याचेसह त्याचे साथीदार आरोपी नामे 1 ) दिपक नैत्राम जाधव 2) राहुल रामु पवार 3 ) चरण विजय पवार 4) संजय रामेश्वर बागडे 5) अजय सिकंदर जाधव सर्व रा. चंद्रपुर हेटी किन्ही ता. हिगणा जि. नागपुर यांना शिताफिने अटक करुन त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने व त्यांचे कडुन गुन्हयातील सहा आरोपींनी दरोडा टाकुन नेलेल्या बकऱ्या विकुण मिळविलेली नगदी 1,02,300 / – व गुन्हयात वापरलेली बुलेरो पिकअप मॅक्स गाडी क्रमांक एम. एच. 27 बि. एक्स 8489 किमत 7,00,000/- व चार मोबाईल हॅन्डसेट किमत 30,000/- असा एकुन 8,32,300 /- रु चा मुद्देमाल जप्त करून गुन्हयात दरोड्याची व अपहरणाची कलम 395,363,506 वाढ केली व 6 आरोपीतांना गुन्हयात अटक
करण्यात आली असुन तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मागदर्शनात ठाणेदार स.पो.नि.
वंदना सोनुने, पो.उप.नि. श्यामसुदर सुर्यवंशी, पो. हवा. आंनद भस्मे, पोशि उमेश खामनकार,कांचन चाफले, संदेश सोयाम, नितीन नखाते यांनी केली आहे.




