वर्धा SDPO पथकाचा चेंगड जुगारावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे  पथकाचा  पो.स्टे. रामनगर हददीत चेंगड जुगारावर छापा,५ जुगारींसह एकुन  1,88,720/- रू चा माल केला जप्त…..

वर्धा(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(18)रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे अधिनस्त असलेले पथक वर्धा शहरात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे यांना गोपनीय सुत्राद्वारे बातमी मिळाली की पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील आदीवासी कॉलोनी, इंदीरा नगर वर्धा येथील महादेव मंदीरा जवळ सिमेंट रोडवर सार्वजनिक ठिकानी विजेन्द्र भोयर यांचे घरासमोर काही ईसम चेंगड नावाचा जुगार खेळताय





यावरुन सदर बातमीची शहानीशा करुन सदरची माहीती प्रभारी उपविभागिय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांना कळवुन त्यांचे सुचनेनुसार सदर ठिकाणी पथक प्रमुख पोलिस उपनिरिक्षक परवेज खॅान व पथकातील ईतर सहकार्यासह जुगारावर छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) शुभम कैलास किन्नाके वय 31 वर्षे रा. इतवारा बजार वर्धा 2) विनोद रामभाउ चौधरी वय 44 वर्षे रा. काचनुर ता.आर्वी जि.वर्धा 3) गिरीष पांढरंगजी मुके वय 44 वर्ष रा. सुदामपुरी वर्धा 4) इम्रान नसीर शेख वय 30 वर्षे रा. इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा 5 ) तनविर कादर शेख वय 38 वर्ष रा. गजानन नगर वर्धा असे मिळुन आले असुन यातील  दोन आरोपी सदर ठिकाणावरुन पसार झाले. सदर ठिकाणावरुन  एक आकडे लिहलेला बॅनर, 52 तास पत्ते, तीन मोबाईल टच पॅड वाले 4 दुचाकी मोपेड वाहन असा एकुन कि 1,88,720 /- रू चा मुद्देमाल मिळुन आला यावरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे आरोपीविरूध्द अपराध क्रमांक 386 / 2024 कलम 12 म. जु.का. . अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर  करीत आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे याचे विशेष मार्गदर्शन प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. परवेज खॉन, पो.स्टे.रामनगर येथील श्रेणी पो.उप.नि युसुफ खॉन उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो. हवा. अमर लाखे,पवन निलेकर,, पो.शि, मंगेश चावरे, समीर शेख, व पो.स्टे. रामनगर येथील कर्मचारी पो.हवा. राजेश घाटे, मंगेश शेंडे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!