बँकेतून पैसे चोरणारा मध्यप्रदेशातील आरोपी जेरबंद; परतवाडा-अंजनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि अंजनगाव-परतवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गाड्यांच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे.

बँकेतून पैसे काढले आणि डिक्कीतून रक्कम लंपास ६ जुलै २०२६ रोजी फिर्यादी परिमल विजय परी (रा. अभिनव कॉलनी, अचलपूर) यांनी अचलपूर येथील एसबीआय (SBI) मुख्य शाखेतून पैसे काढले आणि ते त्यांच्या मोपेड गाडीच्या डिक्कीत ठेवले होते. आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि मिल कॉलनी स्टॉपवरून त्यांच्या डिक्कीतून १,२०,००० रुपये रोख चोरून नेले. याप्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा (अपराध क्रमांक ४५८/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.) नोंदवण्यात आला होता.ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



सीसीटीव्ही फुटेज आणि अंजनगाव पोलिसांची तत्परता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परतवाडाचे ठाणेदार अजय आकरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क केले होते व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना पाठवले होते. दरम्यान, अंजनगाव सुर्जी येथील गुन्हे प्रकटीकरण पथक अंजनगाव येथील एसबीआय (SBI) मुख्य शाखा परिसरात गस्त घालत असताना, त्यांना सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाशी मिळताजुळता एक संशयित इसम बँकेत संशयास्पद स्थितीत फिरताना आढळला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.

मध्यप्रदेशातील आरोपी अटक, ९० हजारांची रोकड जप्त ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव बाबू विक्रमसिंग सिसोदीया (वय २५ वर्षे, रा. कडीया, जिल्हा राजगड, मध्यप्रदेश) असे आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांच्या (शिवराज सोनू सांसी आणि वसंत बनवारी सांसी, दोघेही रा. राजगड, मध्यप्रदेश) मदतीने परतवाडा येथील मिल कॉलनी स्टॉपवरून १,२०,००० रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्याकडून चोरी गेलेल्या रकमेपैकी ९०,००० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. सध्या पोलीस फरार आरोपींचा आणि उर्वरित मुद्देमालाचा शोध घेत आहेत.



कारवाई करणारे पोलीस पथक:

अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार पो.नि. सुरज बोंडे, परतवाडाचे ठाणेदार पो.नि. अजय आकरे, पो.उपनि. आकाश शिवनकर, तसेच पोलीस अंमलदार सचिन होले, सुधिर राउत, शुभम शर्मा, सचिन कोकणे, घनशाम किरोले, जितेश बाबील, रवी राठोड, शुभम मार्कड, आकाश रंगारी आणि अमीत घाटे यांच्या पथकाने केली आहे.



अमरावती ग्रामीण पोलिसांचे जनतेला आवाहन:  बँकेतून किंवा बाजारातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करताना नागरिकांनी खालील काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे:

  • बँकेतून मोठी रक्कम काढताना शक्यतो विश्वासू व्यक्तीला सोबत ठेवावे.



  • रोख रक्कम सुरक्षित बॅगमध्ये ठेवून शक्य तितक्या लवकर इच्छित ठिकाणी पोहोचावे; वाहनाच्या डिक्कीत किंवा उघड्यावर पैसे व दागिने ठेवणे टाळावे.

  • अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारची मदत स्वीकारू नये.

  • सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केल्यानंतर दुकानाबाहेर त्याचे प्रदर्शन टाळावे.

  • ज्येष्ठ नागरिकांनी मोठी रक्कम किंवा मौल्यवान वस्तू घेऊन जाताना नातेवाईकांची मदत घ्यावी.

  • कोणताही संशय आल्यास, पाठलाग होत असल्याचे जाणवल्यास किंवा फसवणुकीची शंका आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!