अमरावती: गाडगेनगर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड, ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई: सरस्वत नगर येथील घरफोडीचा गुन्हा उघड, ९० हजारांचे मंगळसूत्र जप्त

अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावत चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्याची सविस्तर माहिती समोर आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त  राकेश ओला  पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त. कैलाश पुंडकर (गाडगेनगर विभाग, अमरावती शहर) यांच्या निर्देश व सूचनेनुसार करण्यात आली.

नेमकी घटना काय?

तक्रारदार मंगेश उत्तमराव आंबेकर (रा. सरस्वती नगर, अमरावती) यांनी १ जून २०२६ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी आंबेकर कुटुंब एका लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, त्यांच्या पत्नीचे अंदाजे ५ ते ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (ज्याची जुनी किंमत ४०,०००/- रुपये होती) ते घरातच विसरले होते. लग्न आटोपून घरी परत आल्यावर त्यांनी शोध घेतला असता, ते मंगळसूत्र घरात मिळून आले नाही. यावरून घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अप.नं. ६२८/६ कलम ३०५(अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.



तपास आणि आरोपीची कबुली

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी फिर्यादीच्या घरी येणाऱ्या एका लहान मुलाकडे विचारपूस केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे, शंतनु प्रदिप पवार (वय २४ वर्षे, रा. चौधरी लाईन, गाडगेनगर, अमरावती) याने मोबाईलच्या नादापायी १२ वर्षांखालील एका अज्ञात बालकाकरवी ही चोरी घडवून आणल्याचे उघड झाले.

आरोपी शंतनु पवार याने घरातून चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची (वजन अंदाजे ६ ग्रॅम, चालू बाजारभावानुसार किंमत ९०,०००/- रुपये) सोन्याची लगड तयार करून ती स्वतःजवळ ठेवली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि ९०,०००/- रुपये किमतीची सोन्याची लगड पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.



पोलीस पथकाची कामगिरी

तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (क्राईम)  विजया पंढरे, आणि पोलीस निरीक्षक (प्रशासन)  प्रमोद पाचकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास, पोलीस हवादार भारत वानखडे, नंदकिशोर करोची, पोलीस नाईक राजेश गुरेले, पोलीस शिपाई सुशांत प्रधान, धनराज कुमरे, महेश शर्मा, आणि चालक पोलीस शिपाई बळीराम गायकवाड यांनी ही कामगिरी बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!