अमरावती: पोटे कॉलेज रोडवरील जबरी चोरीप्रकरणी २ आरोपींना अटक; ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांची कारवाई व गुन्हा उघडकीस दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इतवारा बाजार परिसरात दोन इसम चोरीचा मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांनी खात्रीशीर माहितीवरून सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. बारकाईने चौकशी केली असता, त्यांनी ९ जुलै २०२६ रोजी पोटे कॉलेज रोडवर पल्सर गाडीवरून मुलगा व मुलीकडून […]

Read More

गांजा विक्रीचा डाव उधळला! हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: ३८२ ग्रॅम गांजासह २४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; राहुल दानवला अटक हिंगणघाट (वर्धा): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना, हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने (DB Team) एका घरावर छापा मारून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून ३८२ ग्रॅम गांजा आणि भ्रमणध्वनी […]

Read More

धुळे-नाशिक मंदिर चोरीचा पर्दाफाश: मध्य प्रदेशातील २ चोरटे गजाआड; ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे-नाशिक मंदिर चोरीचा पर्दाफाश: मध्य प्रदेशातील २ सराईत चोरटे जेरबंद; ४.१९९ किलो चांदीसह ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त विशेष प्रतिनिधी (गणेश शेंडे), धुळे: धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये घरफोडी आणि दानपेटी फोडून आभूषणे लांबवणाऱ्या मध्य प्रदेशातील एका सराईत टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, […]

Read More

चंद्रपूर घरफोडी: छत्तीसगडमधून चोरट्याला अटक; ३ लाखांची रोकड जप्त

चंद्रपूर: बसस्थानक परिसरातील ६ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; छत्तीसगडमधून आरोपी जेरबंद, ३ लाखांची रोकड जप्त स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर यांनी धडक कारवाई करत शहरातील बसस्टँड परिसरातील एका कार्यालयातून ६ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला छत्तीसगड राज्यातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या रकमेपैकी ३ लाख रुपयांची रोकड यशस्वीरीत्या जप्त केली आहे. कार्यालयातून ६ […]

Read More

अकोट पोलिसांचा धडक प्रहार: २९.५ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त

अकोट येथे पोलिसांची धडक कारवाई: २९,५४,२०४ रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा व वाहन जप्त अकोला / अकोट: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला (गुटखा) आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अकोट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी १७,५४,२०४ रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू तसेच १२,००,००० रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा […]

Read More

सातारा LCB चा मोठा धडका: चोरीस गेलेला १३ लाखांचा टँकर २४ तासांत जप्त, दोघांना बेड्या

सातारा / लोणंद: फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राजवळून चोरलेला १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर अवघ्या २४ तासांच्या आत हस्तगत करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा टँकर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ‘सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा. लि. फलटण’ या […]

Read More

हिंगणघाट: गांजा विकणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त!

हिंगणघाट येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: गांजा विकताना आरोपी रंगेहाथ अटक, मुद्देमाल जप्त वर्धा (विशेष बातमीदार): वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची अवैध विक्री व बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली […]

Read More

हिंगणघाट पोलिसांची मोठी कामगिरी: रूबा चौकात मोबाईल दुकान फोडणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद; १.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

हिंगणघाट (जि. वर्धा): हिंगणघाट शहरातील रूबा चौक परिसरात असलेल्या ‘बालाजी मोबाईल शॉपी’चे शटर तोडून मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला १ लाख ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण १ लाख ८० हजार ६०० […]

Read More

‘ऑपरेशन कवच’अंतर्गत कारवाई; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गांजा तस्करी करणारे दोन आरोपी अटक; ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त परतवाडा (अमरावती): ऑपरेशन कवच अंतर्गत अवैध धंद्यांवर आणि अमली पदार्थ तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी दिले आहेत. या आदेशानुसार कारवाई करत परतवाडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा गांजा आणि मोटरसायकल जप्त […]

Read More

चंद्रपूर एलसीबीची मोठी कारवाई: १.४५ लाखांचा ‘एमडी’ ड्रग्ज साठा जप्त!

चंद्रपुरात १.४४ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह तस्कर गजाआड; स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई चंद्रपूर (२९ जुलै २०२६): चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने (LCB) धडक कारवाई करत अवैधपणे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका सराईत तस्कराला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १८.९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि मोबाईल फोनसह एकूण १,४४,७५० रुपये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!