अमरावती: वृद्ध सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैसे लुटणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अमरावती: फुलबासा, मंगलधाम कॉलनी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेणाऱ्या आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. श्रवण राजेश बनारसे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त  यशवंत सोळंके ,पोलीस उपआयुक्त  प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त […]

Read More

मुख्य बातमी: खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना राजापेठ पोलिसांकडून अटक

अमरावती (दि. १० जुलै २०२६): अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानखेडा बु. येथील एका गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. २ जुलै २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा  दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश मुंढे करत […]

Read More

अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज आणि गांजासह तिघांना अटक, ३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती: – अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ (Zero Tolerance Policy) राबवली जात आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, अमरावती शहर पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी २२.०७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजासह एकूण ३ लाख ६३ हजार […]

Read More

अमरावती शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ३७ गोवंश जनावरे जप्त, २ आरोपी ताब्यात

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखेने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या कारवाईदरम्यान ४,८६,००० रुपये किमतीची ३७ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने या जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.सदरची धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला  पोलीस उपआयुक्त यशवंत […]

Read More

अमरावती पोलिसांकडून आंतरजिल्हा दुचाकी चोर अटक; ५० हजारांची दुचाकी जप्त

 अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका दुचाकी चोराला अटक केली असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी वर्धा येथून चोरीला गेली होती.गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, लालखडी येथील एक व्यक्ती चोरीची सिल्वर रंगाची होंडा कंपनीची […]

Read More

बँकेतून पैसे चोरणारा मध्यप्रदेशातील आरोपी जेरबंद; परतवाडा-अंजनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि अंजनगाव-परतवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गाड्यांच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. बँकेतून पैसे काढले आणि डिक्कीतून रक्कम लंपास ६ जुलै २०२६ रोजी फिर्यादी परिमल विजय परी (रा. अभिनव कॉलनी, अचलपूर) यांनी अचलपूर येथील एसबीआय (SBI) […]

Read More

अमरावती गुन्हे शाखेकडून अवघ्या दोन तासांत खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

दिनांक ४ जुलै २०२६ रोजी रात्री साधारण ११:३० वाजताच्या सुमारास गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विद्याभारती कॉलेजजवळ एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. जायेद हुसैन खान (वय २८ वर्ष, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांच्यात झालेल्या तात्कालिक भांडणातून हा खून झाला होता. […]

Read More

अमरावती: जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरणारा जेरबंद, गुन्हे शाखेकडून वाहन जप्त

अमरावती शहरातील जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  अमरावती येथील नवसारी, श्रद्धा कॉलनीतील रहिवासी उमेश बाबूलाल जाधव यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली होती. जाधव हे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर आपली […]

Read More

अमरावती: फ्रेजरपुरा जबरी चोरी प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा तपशील आणि गुन्हा: दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री, देवनारायण शिवचरण पांडे (वय ७२ वर्षे, रा. उषा कॉलनी, अमरावती) हे मंगलधाम येथील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून झोपले होते. १ जुलै […]

Read More

नागपूरमधून १.५३ कोटींची ‘शिवाई’ बस चोरणारा आंतरराज्यीय चोरटा अमरावतीत जेरबंद

राजापेठ  पोलिसांनी इमामवाडा बस स्थानक, नागपूर येथून १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ‘शिवाई’ बस (क्रमांक MH 49 BJ 8258) चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय चोरट्याला अटक केली आहे.ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आरोपीची माहिती: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!