दारव्हा-दिग्रस शेतशिवारात धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी जेरबंद; ₹१.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ गुन्हे उघड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) दारव्हा आणि दिग्रस परिसरातील शेतशिवारात चोऱ्या करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ₹१,५६,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

 दारव्हा आणि दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतातून पाण्याचे मोटार पंप, तांब्याची केबल वायर आणि गोदामातून सोयाबीन चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. ६ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक दारव्हा परिसरात गस्त घालत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इस्लामपुरा (दारव्हा) येथे सापळा रचण्यात आला. तेथे संशयित मुख्य आरोपी महमंद मुद्दसीर महमंद मुस्ताक (वय २५, रा. इस्लामपुरा, दारव्हा) याला विना क्रमांकाच्या मोपेड दुचाकीवर तांब्याच्या तारांसह रंगेहात ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान त्याने ४ गुन्हे केल्याची कबुली दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक  अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.  सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



 चोरीची पद्धत (Modus Operandi): अटक केलेला आरोपी व त्याचे साथीदार दारव्हा आणि दिग्रस परिसरातील विहिरी तसेच शेतातील गोदामांची दिवसा ‘रेकी’ (पाहणी) करायचे. त्यानंतर शेतात शेतकरी नसल्याचा फायदा घेऊन ते रात्रीच्या वेळी धाडसी चोऱ्या करायचे.

 उघडकीस आलेले गुन्हे (४ गुन्हे):



  • पो.स्टे. दारव्हा अप.क्र. ५६७/२६, कलम ३०५, ३३१(४) भा.न्या.सं.

  • पो.स्टे. दारव्हा अप.क्र. ४४२/२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.



  • पो.स्टे. दारव्हा अप.क्र. ५६९/२६, कलम ३०५, ३३१(४) भा.न्या.सं.

  • पो.स्टे. दिग्रस अप.क्र. २८१/२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.



 जप्त केलेला एकूण मुद्देमाल (एकूण किंमत ₹ १,५६,६००/-):

  • इलेक्ट्रिक मोटार पंप: ०२ नग (एक सबमर्सिबल व एक जुना पाण्याचा पंप) – किंमत ₹ १८,६००/-

  • तांब्याची तार (मोटार वाइंडिंग): १५ किलो – किंमत ₹ १८,०००/-

  • धान्य (सोयाबीन): ११ प्लास्टिक कट्टे (सुमारे ०४ क्विंटल) – किंमत ₹ २०,०००/-

  • गुन्ह्यात वापरलेले वाहन: विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‘मारुती सुझुकी बर्गमॅन’ मोपेड दुचाकी – किंमत ₹ १,००,०००/-

 आरोपींची माहिती:

  • महमंद मुद्दसीर महमंद मुस्ताक (वय २५, रा. इस्लामपुरा, दारव्हा) – [अटक]

  • या गुन्ह्यातील इतर २ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 यशस्वी कामगिरी करणारे पोलीस पथक:

यामध्ये पोलीस उप-निरीक्षक शिवशंकर दिनकर कायंदे, पोलीस अंमलदार सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, किशोर झंडेकर, पवन ढवळे, अमित झंडेकर आणि चालक अमित कुमरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!