अवैध गोवंश मांस वाहतुकीवर खदान पोलिसांची धडक कारवाई; दोन आरोपींना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला येथील खदान पोलीस स्टेशनने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  रेड्डी साहेब, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे:



  • घटना आणि कारवाई: १२ जुलै २०२६ रोजी खदान पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीदरम्यान अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

  • अटक करण्यात आलेले आरोपी: १) शेख रेहान शेख रहेमान (वय २३ वर्षे, रा. कसबा पुरा, बार्शीटाकळी, अकोला) २) रशीद खान युसुफ खान (वय ३५ वर्षे, रा. इस्लामचौक, हैदरपुरा, खदान, अकोला)



  • जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

    • १५० किलो गोवंश मांस



    • सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड गाडी (क्र. MH-30 BN-2287)

    • बजाज कंपनीचा गोगो ऑटो (क्र. MH-30 BC-5604) (एकूण जप्त माल किंमत: अंदाजे ३,५०,०००/- रुपये)



कारवाई करणारी टीम:

या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक श्री मनोज केदारे, पोलीस अंमलदार निलेश खंडारे, भुषण मोरे, अभिमन्यु सदाशिव, वैभव कस्तुरे, शिवम दुबे, आणि मंगेष खेडकर (पोलीस स्टेशन खदान, अकोला) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी नितीन लेव्हरकर यांनी जारी केले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!