पांढरकवडा पोलिसांची मोठी कामगिरी: २.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दुचाकी चोरटा गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दरोडा व घरफोडीच्या गुन्ह्यांतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी सुमारे ₹६०,१०,८०२/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

घटना व गुन्ह्यांचा तपशील



  • पहिली घटना (घरफोडी): दिनांक १५ जुलै २०२६ च्या मध्यरात्री मोहदा (ता. केळापूर) येथील ‘राजेंद्र ज्वेलर्स’चे दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण ₹९७,५०,०००/- चा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी राजेंद्र वर्मा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • दुसरी घटना (दरोडा): त्यापूर्वी, १४ जुलै २०२६ रोजी रात्री मोहदा ते मेटीखेडा रोडवर ७ अज्ञात इसमांनी रवींद्र कांबळे यांना मारहाण करून ₹४४,३००/- ची रोकड व सोन्याची अंगठी जबरीने पळवून नेली होती.



पोलीस कारवाई व आरोपींची अटक गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळचे पोलीस अधीक्षक  कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ०७ विशेष पथके तयार करण्यात आली.

तंत्रज्ञानाच्या (Technical Investigation) मदतीने गुन्ह्यात वापरलेले वाहन पुण्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे पोलिसांनी पुढील ३ मुख्य आरोपींना ताब्यात घेतले:



  1. विशाल रघु कुंभार (वय २५ वर्ष, रा. चाकण, जि. पुणे)

  2. सौरुपशी उर्फ सौरसींग राजकुमार राठोड (वय ३४ वर्ष, रा. शिक्रापूर, जि. पुणे)



  3. अभिमन्यु अलसींग राठोड (वय ३८ वर्ष, रा. डाळींब, जि. पुणे)

हस्तगत केलेला मुद्देमाल तपासादरम्यान आरोपींनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण ₹६०,१०,८०२/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस पथकांकडून घेतला जात आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!