अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; ३९ किलोहून अधिक गांझा जप्त, एक तस्कराला बेड्या!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अकोला (दि. १९ ऑक्टोबर २०२६):

जिल्ह्यात अवैध धंदे आणि अंमली पदार्थ तस्करांचे समूच्छेदन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सध्या विशेष ‘ऑपरेशन प्रहार’ राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत अकोट फाइल पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकला. या कारवाईत तब्बल ३९.४ किलो ओला गांजा आणि एक मोबाईल असा एकूण १०,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका तस्कराला जागीच अटक करण्यात आली आहे.



कारवाईची पार्श्वभूमी व मिळालेली गुप्त माहिती

दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पथकास गुप्त बातमीदारामार्फत अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली. पोलीस स्टेशन अकोट फाइल हद्दीतील संत कबीर नगर, आपातापा रोड येथील राजेश प्रल्हाद भेंडवाल याने आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याची ही माहिती होती.



माहिती मिळ Fiताच पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पंचांसह कारवाईची तयारी केली.



छापा, पंचनामा आणि जप्त मुद्देमाल

गुप्त माहितीच्या आधारे शासकीय पंच, नायब तहसीलदार (राजपत्रित अधिकारी), अधिकृत वजन काटेवाला आणि व्हिडिओ/फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत पथकाने राजेश भेंडवाल याच्या घरावर थेट छापा टाकला.

  • तपासणी व बंडल: पंचांसमक्ष घराची कसून झडती घेतली असता, समोरच्या हॉलमध्ये मोठ्या कापडी पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेले एकूण ३९ बंडल ओला गांजा आढळून आला.



  • वजन व किंमत: प्रमाणित इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजणी केली असता एकूण ३९ किलो ४०० ग्रॅम गांजा निष्पन्न झाला, ज्याची बाजारातील किंमत ९,८५,००० रुपये आहे.

  • इतर जप्ती: गुन्ह्यात वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाईल (किंमत १५,००० रुपये) सह एकूण १०,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच सीलबंद करून जप्त करण्यात आला.



आरोपीची सखोल चौकशी व गुन्ह्याची नोंद

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राजेश प्रल्हाद भेंडवाल (वय ४५ वर्षे, रा. संत कबीर नगर, आपातापा रोड, अकोट फाइल, अकोला) याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने हा सर्व गांजा त्याच्या अन्य साथीदारांनी दोन दिवसांपूर्वी कारमधून आणून घरात साठवण्यासाठी दिल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अकोट फाइल, अकोला येथे NDPS कायदा अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मार्गदर्शन व यशस्वी पोलीस पथक

सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. नीतीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पथकात सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि अनिल चव्हाण, तसेच विष्णु बोडखे, माजिद पठाण, पोहेकॉ वसीमोद्दीन, किशोर सोनोने, रवि खंडारे, मंगेश इंगळे, स्वप्नील खेडकर, सुलतान पठाण, खुशाल अहमद, अमित दुवे, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज नेमाडे, शेख चंदेल, आकाश हसन, अब्दुल माजीद, एजाज मानकर, धिरज वानखडकर, पवनडंबुलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद अमीर, सतीश पवार, अशोक सोनवणे, भिमराव दिपके तसेच चालक प्रवीण कश्यप, मनिष ठाकरे, देवानंद खराख, प्रकाश लोखंडे यांनी सहभाग घेऊन ही कारवाई फत्ते केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!