पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई; मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन आरोपींसह दुचाकी ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

चोरीची घटना आणि गुन्हा नोंद: दिनांक १६ जून २०२६ रोजी रात्री २:०० ते सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान, ताडउमरी (ता. केळापूर) येथील रहिवासी हेमंत देवराव कोडापे यांची घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची जुनी हिरो स्प्लेंडर मोटार सायकल (क्र. एम.एच. २९ एच ५४०६, किंमत अंदाजे ३५,००० रुपये) अज्ञात चोराने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा (अप.क्र. ८०९/२०२६, कलम ३०३ (२) भा.न्या.स.) नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. सदरची यशस्वी कामगिरी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा) रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनात पार पडली.



पोलिसांची कारवाई आणि आरोपींना अटक: पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डी.बी. पथक) गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, ताडउमरी येथील रहिवासी प्रणय नामदेव नैताम (वय १८ वर्षे ८ महिने) याने ही मोटार सायकल चोरी केली असून, ती नेहरू नगर, घाटंजी येथील रहिवासी प्रेम अमर थुल (वय २२ वर्षे) याच्याकडे लपवून ठेवली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घाटंजी येथील प्रेम थुल याच्या घरावर छापा टाकला असता, चोरीची मोटार सायकल त्याच्या ताब्यात मिळून आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तपासकामी ताब्यात घेतले आहे.



कारवाई करणारे पोलीस पथक: या कारवाईत पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद जुनुकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, नाईक पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, सचिन काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्तलवार यांनी सहभाग घेतला.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!