जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: ११.३५ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, एक आरोपी अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जालना जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ७ जुलै २०२६ रोजी मोठी कारवाई केली आहे. नाव्हा चौफुली परिसरात सापळा रचून पोलिसांनी मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  तेघबीरसींग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक  विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • आरोपीचे नाव: महेबुब खाजा शेख (वय ३१ वर्षे, रा. आक्सामज्जीदजवळ, बालाजी नगर, जालना).



  • जप्त केलेला मुद्देमाल:

    • महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधीत राजनिवास पान मसाला व केएन-०१ जाफरानी जर्दा (किंमत ₹८,८५,६००/-)



    • एक लोडिंग चारचाकी वाहन (क्रमांक MH 21 BH 7400, किंमत ₹२,५०,०००/-)

    • एकूण जप्त मुद्देमाल: ₹११,३५,६००/- (अकरा लाख पस्तीस हजार सहाशे रुपये)



  • नाव्हा चौफुली, जालना शहर.

अशी झाली कारवाई: जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसींग संधू यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक माहिती गोळा करत असताना, ७ जुलै २०२६ रोजी एका गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली. नाव्हाकडून जालना शहराकडे एका लोडिंग वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी नाव्हा चौफुली येथे नाकाबंदी करून संशयित वाहन थांबवले.



वाहनाची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सुगंधी पानमसाला आणि जर्दा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल आणि वाहनासह चालक महेबुब खाजा शेख याला ताब्यात घेतले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक:

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ, तसेच अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, इर्शाद पटेल, सतिश श्रीवास, सोपान क्षीरसागर आणि चालक अशोक जाधवर यांच्या पथकाने केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!