गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई:देहव्यवसाय करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपूर:



शहरातील राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरच्या आडोशाने सुरू असलेला अवैध देहव्यापाराचा गोरखधंदा उघडकीस आला असून, पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. तसेच ३ पीडित महिलांची तावडीतून सुटका करण्यात आली आहे.



नक्की काय घडले?

दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी १६.२५ ते २०.५५ वाज V दरम्यान, गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकातील अधिकारी आणि अंमलदार गस्तीवर (पेट्रोलिंग) होते. यादरम्यान त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतवाल नगर येथील कांता पॅलेस, प्लॉट नंबर २०० मधील ‘अव्हीरा पंचकर्म अ‍ॅण्ड स्पा सेंटर’ येथे पंचासमक्ष अचानक छापा टाकला.

स्वतःच्या फायद्यासाठी चालवला होता व्यवसाय

तपासणी दरम्यान असे समोर आले की, काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना आणि पीडित महिलांना देहव्यापाराकरिता जागा उपलब्ध करून देत होते व तिथे हा अवैध व्यवसाय चालवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील दोन संशयित आरोपींना रंगेहात पकडले:



  1. योगेश अशोकराव इंगोले (वय ३५ वर्षे, रा. गीता नगर, मानेवाडा, बेसा, नागपूर)

  2. सुप्रिया राजु रायकवार (वय ३५ वर्षे, रा. भुपेश नगर, बोरगांव, नागपूर)



मुद्देमाल जप्त व गुन्हा दाखल

या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ३ पीडित महिलांची सुटका केली आहे. तसेच त्यांच्याकडून रोकड २,५०० रुपये, २ मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण १७,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींविरुद्ध राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्याअनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व आरोपी व पीडित महिलांना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी राणाप्रताप नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



पोलिसांचे मार्गदर्शन व पथक

सदर उल्लेखनीय कामगिरी राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), दीपक अग्रवाल (पोलीस उप आयुक्त, डिटेक्शन) व वैभव जाधव (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नन्नाware, पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे, किशोर ठाकरे, नितीन वासने, प्रकाश माथनकर, महिला पोलीस हवालदार लता गवई, पुनम शेंडे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी खोडपेवार यांनी सहभाग घेतला होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!