अमरावती: ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची मोठी कारवाई; ९४ लाखांच्या मुद्देमालासह अवैध रेती व २ डंपर जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती ग्रामीण: ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची मोठी कारवाई; ९४ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या अवैध रेतीसह डंपर जप्त!

चांदूर बाजार (अमरावती): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील वरली जुगार, अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी, अवैध गौवंश वाहतूक आणि अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. या आदेशानुसार, १९ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध एक मोठी संयुक्त मोहीम राबवण्यात आली.सदर धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक  दत्ता तोटेवाड, आणि अंजनगाव सुर्जी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पहाटेच्या पेट्रोलिंग दरम्यान कारवाई

१९ जून रोजी सकाळी ०५:०० ते ०७:०० वाजेच्या दरम्यान ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन, अमरावती ग्रामीणची वाहतूक शाखा आणि तिवसा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी ब्राम्हणवाडा थडी येथील वणी T पॉइंट जवळ टाटा कंपनीचे दोन संशयास्पद डंपर (एक १२ चाकी आणि एक १६ चाकी) विनापरवाना अवैध कन्हाण रेती (वाळू) चोरून घेऊन जाताना आढळले. पोलिसांनी दोन्ही डंपर थांबवून त्यांची पाहणी केली असता हा अवैध प्रकार उघडकीस आला.



एकूण ९४,४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

  • पहिला डंपर (क्रमांक MH-27-DT-1221): १२ चाकी डंपरमधून विनापासपरवाना १२ ब्रास कन्हाण रेती (किंमत १,२०,०००/- रुपये), डंपर (किंमत ४०,००,०००/- रुपये) आणि २ अँड्रॉइड मोबाईल (किंमत ५०,०००/- रुपये) जप्त.



  • दुसरा डंपर (क्रमांक MH-40-CM-8788): १६ चाकी डंपरमधून विनापासपरवाना २० ब्रास कन्हाण रेती (किंमत २,००,०००/- रुपये), डंपर (किंमत ५०,००,०००/- रुपये) आणि ३ अँड्रॉइड मोबाईल (किंमत ७५,०००/- रुपये) जप्त.

एकूण जप्त मुद्देमाल: दोन डंपर, ३२ ब्रास रेती आणि ५ मोबाईल मिळून एकूण ९४,४५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



५ आरोपींवर गुन्हे दाखल

पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेका) मनीष देशमुख (ब.नं. १४४५) यांच्या फिर्यादीवरून एकूण ५ आरोपींविरुद्ध ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. २४४/२०२६ आणि २४५/२०२६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींची नावे: १. मुनिफ खान मुख्तार खान (पहिला डंपर चालक, रा. अशरफपुरा, अचलपूर) २. रविंद्र बाबूलाल पांडे (वय ३८ वर्षे, पहिला डंपर क्लिनर, रा. सालेपूर पांढरी, अचलपूर) ३. टिकाराम लेहाराम नागवंशी (वय ३९ वर्षे, दुसरा डंपर चालक, रा. पिंपळखुटा, ता. वरुड) ४. देविदास मैनु गजाम (वय २८ वर्षे, दुसरा डंपर क्लिनर, रा. पंढरी, ता. वरुड) ५. राजु उर्फ शेख नईम शेख करीम (वय ३४ वर्षे, दोन्ही डंपरचा मालक, रा. जरुड, ता. वरुड)



लागलेली कलमे: आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३०३ (२), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९, १५, सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियम कलम ३, ७ आणि मोटार वाहन कायदा (MVA) कलम १८४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक

या पथकात वाहतूक शाखेचे पोनि नितीन देशमुख, तिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोनि गोपाल उपाध्याय, ब्राम्हणवाडा थडीचे ठाणेदार सहा.पो.नि. प्रशांत जाधव, तसेच पोहवा राजू मरसकोल्हे, अमोल राऊत, पोशि अनुप मानकर, अंकुश दाभाडे, दिलीप उईके, सैनिक नितेश मनवर आणि वाहतूक शाखा व तिवसा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!