पवनी पोलिसांची धडक कारवाई: ११३ किलो अवैध सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात पवनी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १,६१,५९० रुपये किमतीचा ११३ किलो ६०० ग्रॅम सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकी घटना काय?

पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाईतलाय वॉर्ड (पवनी) येथे राहणारा आरोपी तौफीक जुनैद बेग (वय ४० वर्ष) हा आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू अवैध मार्गाने विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची खबर पोलिसांच्या गुप्तहेराकडून (मुखबीर) मिळाली.



माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष आरोपीच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मु मुद्देमालाचा तपशील

अ.क्र. तंबाखूचा प्रकार / ब्रँड नग / संख्या एकूण वजन अंदाजे किंमत
१ सुगंधित तंबाखू एम डी ७ १५० नग (प्रति पॅकेट २०० ग्रॅम) ३० कि.ग्रॅ.

₹ ३५,२५०/-



२ सुगंधित तंबाखू होला ८० नग (प्रति पॅकेट १ कि.ग्रॅ.) ८० कि.ग्रॅ.

₹ १,०६,०००/-

३ सुगंधित तंबाखू मजा १०८ १८ बॉक्स (प्रति बॉक्स २०० ग्रॅम) ३ कि.ग्रॅ. ६०० ग्रॅम

₹ २०,३४०/-



एकूण एकत्रित जप्त साठा — ११३ कि.ग्रॅ. ६०० ग्रॅम

₹ १,६१,५९०/-

कठोर कलमांखाली गुन्हा नोंद

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:



  • अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६

  • भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

सदर यशस्वी कारवाई  पोलीस अधीक्षक  नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवाल्दार मेश्राम यांनी पूर्ण केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक गतीने करत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!