अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज आणि गांजासह तिघांना अटक, ३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: – अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ (Zero Tolerance Policy) राबवली जात आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, अमरावती शहर पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी २२.०७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजासह एकूण ३ लाख ६३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

वाळकी डॅम्प रोडवर रचला सापळा:-  दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला एका विश्वासू बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सैफ अली आसिफ अली हा इसम मॅफेड्रॉन (एम.डी) तसेच गांजा या अंमली पदार्थांची विक्री करतो. तो आणि त्याचे दोन साथीदार दुपारी २:०० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी डॅम्पकडे जाणाऱ्या रोडने एम.डी. विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार आहेत.या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाळकी डॅम्प रोडवर सापळा रचला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. दोन पंच आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अंमली पदार्थ आणि मुद्देमाल आढळून आला.



अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१) सैफ अली आसिफ अली 



२) आवेजउद्दीन नासीरउद्दीन 

३) मोहम्मद तौसिफ मोहम्मद जफर 



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

  • २२.०७ ग्रॅम एम.डी. मॅफेड्रॉन पावडर (किंमत अंदाजे ३,०१,२००/- रुपये)



  • १ किलो १२४ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे २२,२७०/- रुपये)

  • दोन मोबाईल फोन (किंमत अंदाजे ४०,०००/- रुपये)

  • एकूण जप्त मुद्देमाल: ३,६३,४७०/- रुपये

आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे एन.डी.पी.एस. (NDPS) अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रग्जचे नागपूर कनेक्शन उघड मुख्य आरोपी सैफ अली याच्याकडे पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, त्याने हा एम.डी. ड्रग्ज नागपूर येथील ‘इरशाद खान उर्फ अरशद’ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी-विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. तसेच शहरात एम.डी. बाळगणारे, त्याचे सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्यांवर नजीकच्या काळात अशीच तीव्र धडक मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

कारवाई:- ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त  यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्तश्याम घुगे, पोलीस उपायुक्त ) प्रांजली सोनवणे, आणि सपोआ गुन्हे शाखा कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. या धडक कारवाईत सपोनि. महेश इंगोले, पोउपनि गजानन सोनुने आणि गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!