अकोला: विनापरवाना देशी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद, १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना देशी कट्टा बाळगणारा एक आरोपी जेरबंद; १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्ह्यात अवैध धंदे तसेच विनापरवाना अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या […]

Read More

आर्वी बसस्थानकात ३७ हजारांची चोरी; बुलढाणा-अकोल्यातील चार चोरांच्या मुसक्या आवळल्या!

आर्वी बसस्थानकात प्रवाशाचे ३७ हजार लांबवणारी आंतरजिल्हा चोरांची टोळी जेरबंद; बुलढाणा-अकोल्यातील चार जण पोलिसांच्या जाळ्यात! वर्धा  वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानक परिसरात गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील रोख रक्कम लांबवणाऱ्या एका कुख्यात आंतरजिल्हा चोरांच्या टोळीचा आर्वी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील चार सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीची संपूर्ण […]

Read More

हातभट्टीवाला विशाल गौपालेवर MPDA कायद्यान्वये कारवाई, भंडारा कारागृहात रवानगी

हातभट्टीवाला विशाल गौपालेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई; भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी भंडारा दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६: तुमसर तालुक्यातील कुख्यात हातभट्टी दारू विक्रेता विशाल राजेश गौपाले याच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. समाजविघातक कृत्यांमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या सराईत गुन्हेगाराची एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चालू वर्षात या […]

Read More

यवतमाळमध्ये शस्त्रसाठा जप्त: ३ जणांना अटक, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

यवतमाळ हादरले! स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत २.२२ लाखांच्या देशी पिस्तुलासह तीन तस्कर जेरबंद; लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यवतमाळ, ३ नोव्हेंबर २०२६: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यवतमाळ पोलीस दलाने पुन्हा एकदा कडक पावले उचलली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) सतर्क आणि धडक पथकाने लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गोपनिय माहितीच्या आधारे मोठी […]

Read More

नागपुरात एम.डी. पावडरसह दोघे जेरबंद; ५२ ग्रॅम ड्रग्ससह २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त!

नागपुरात गुन्हे शाखेची धडक कारवाई: ५२.७०० ग्रॅम एम.डी. पावडरसह दोघे जेरबंद; २.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त! नागपूर (विशेष प्रतिनिधी): शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड टाकून तब्बल ५२.७०० ग्रॅम एम.डी. पावडरसह दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ६८ हजार १०० […]

Read More

नागपुरात स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापारावर गुन्हेशाखेचा छापा; मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल.

स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर गुन्हेशाखेचा छापा; नागपुरात मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर: शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने मोठी कारवाई केली आहे. स्पाच्या नावाखाली बळाचा आणि आमिषाचा वापर करून देहव्यापार चालवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, या प्रकरणी स्पा मालक महिलेसह मॅनेजरविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Read More

नागपूर: गुन्हे शाखा युनिट ४ कडून वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश; ४ दुचाकींसह ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ दुचाकींसह ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर: नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्र. ०४ च्या पथकाने विशेष मोहीम राबवून एका आंतर-पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात […]

Read More

सीताबर्डी पोलिसांची धडक कारवाई; मेयो कर्मचाऱ्याची चेन हिसकावणारा जेरबंद

नागपूर हादरले: मेयो हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याची दिवसाढवळ्या ८ ग्रॅमची सोन्याची चेन लुटणारा सराईत आरोपी जेरबंद! नागपूर: शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अत्यंत खळबळजनक जबरी चोरीची घटना समोर आली आहे. मेयो हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील (ICU) आपले कठीण कर्तव्य पार पाडून घरी परतणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अज्ञाताने दिवसाढवळ्या लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सतर्क व तत्पर तपास करत सीताबर्डी […]

Read More

सिगारेटच्या वादातून देवळीत हत्येचा थरार: १ तासात ४ आरोपींसह अल्पवयीन ताब्यात

वर्ध्यात थरार: सिगारेटच्या वादातून देवळीत ४२ वर्षीय व्यक्तीची निघृण हत्या; अवघ्या १ तासात ४ आरोपी अटकेत, १ अल्पवयीन ताब्यात देवळी (जि. वर्धा):वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात सिगारेट पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका निघृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना २ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १:०० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत गजानन किशोर पाटणकर (वय ४२ वर्षे, रा. […]

Read More

“गांजा अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; केळझर येथे २ किलो ३८५ ग्रॅम गांजा चार जण जागीच जेरबंद! वर्धा: जिल्ह्यात अंमली पदार्थ बाळगणारे व त्यांची अवैध विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अंमली पदार्थ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!